खा.पटोलेंच्यावतीने सुकळीत श्रीराम कथामृत उद्यापासून

0
20
साकोली,दि.28: साकोली तालुक्यातील सुकळी येथे स्व. फाल्गुनराव पटोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  खासदार नाना पटोले मित्रपरिवाराच्यावतीने श्रीराम कथामृत सप्ताहाचे आयोजन २९ मे ते ५ जूनपर्यंत करण्यात आले आहे. गुरुकुंज आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी, कथाकार हभप प्रकाशपंत वाघ महाराज आहेत. २९ मे रोजी सकाळी ७ वाजता शोभायात्रा, सकाळी ८ ते ११ श्रीराम कथामृत प्रारंभ बालकांड भाग १ श्रीराम चरित्र महिमा, सायंकाळी ७ ते ९ बालकांड भाग २ रामजन्म, खासदार नाना पटोले परिवारद्वारा आरती, ३0 मे रोजी सकाळी ८ ते ११ अयोध्याकांड भाग १ रामवनवास, सायंकाळी ७ ते ९ अयोध्याकांड भाग २ केवटकथा, सायंकाळी आरती आमदार चरण वाघमारे परिवारद्वारा, ३१ मे रोजी सकाळी ८ ते ११ वाजता अरण्यकांड भाग १ सीता अनुसया मिलन, सायंकाळी ७ ते ९ वाजता अरण्यकांड भाग २ सीताहरण प्रसंग, १ जून रोजी सकाळी ८ ते ११ वाजता किष्किन्धाकांड १ श्रीराम मित्रता, सायंकाळी ७ ते ९ वाजता किष्किन्धाकांड-२ सुमूद्रोलंघन, आरती आमदार विजय रहांगडाले परिवारद्वारा, २ जून रोजी सकाळी ८ ते ११ वाजता सुंदरकांड-१, हनुमानद्वारा रावण लंका दहन, सायंकाळी ७ ते ९ सुंदरकांड-२ विभीषण शरणागती, सायंकाळची आरती आमदार परिणय फुके परिवारद्वारा, ३ जून रोजी सकाळी ८ ते ११ वाजता लंकाकांड श्रीरामद्वारा रामेश्‍वर स्थापना श्रीराम रावण युद्ध, सायंकाळी ७ ते ९ उत्तरकांड रामराज्यभिषेक, सायंकाळची आरती आमदार बाळा काशिवार परिवारद्वारा, ४ जून रोजी सकाळी ८ ते ११ रामायण महात्म्य तुलसी विजय आणि फलo्रुती श्रीराम कथामृत समाप्ती, दुपारी ११ ते १२ वाजताहवन व पुर्णाहूती, दुपारी १२ वाजता नारायण सेवा समिती, उदयपूरद्वारा दिव्यांगांची आरोग्य तपासणी व दिव्यांगोपयोगी साहित्यवाटप सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते व आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रा, ५ जून रोजी सकाळी १0 वाजता गोपालकाला, कीर्तन व आरती व महाप्रसाद खासदार नाना पटोले परिवारद्वारा सकाळी ११ वाजता नि:शुल्क रोगनिदान शिबिर, दुपारी १ वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ, १ जून रोजी दुपारी गायत्री २४ कुंडी महायज्ञ व प्रज्ञापुराम, सकाळी ११.३0 ते ५ आरती आ.मदार संजय पुराम परिवारद्वारा, २ जून रोजी सकाळी ११.३0 ते ६ प्रजापिता ब्रम्हकुमारीद्वारा संगीतमय गीताज्ञान प्रस्तुती, ३ जून रोजी सकाळी ११.३0 ते ६ जगतगुरु नरेंद्राचार्याजी महाराज भक्त सेवा मंडळ यांचे कार्यक्रम असल्याचे आयोजक खासदार नाना पटोले परिवार सुकळी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.