तुकाराम झाडे यांची गोंडपिपरी तालुका काॅग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी निवड

0
10

गोंडपिपरी,दि.28- गोंडपिपरीत तालुका काॅग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदी गोंडपिपरी येथिल काॅगेसचे युवा नेते तुकाराम झाडे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांची निवड प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्हा ग्रामिण काॅग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केल्याचे  पत्र सरचिटणीस अॅड गणेष पाटील यांनी दिले आहे. गोंडपिपरी तालुका काॅग्रेेंस कमेटीच्या अध्यक्षपदी काॅग्रेंसचे युवानेते तुकाराम झाडे यांची निवड झाल्यामुळे तालुका काॅग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीबद्दल राजुरा विधान सभेचे माजी आमदार सुभाश धोटे, गोंडपिपरी कृशी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश चैधरी, माजी तालुका काॅग्रेस अध्यक्ष राजिवसिहं चंदेल, शैलेससिहं बैस, रामचंद्र कुरवटकर, शंभुजी येलेकार, दिपक पा. फलके, वासुदेव सातपुते, अशोक रेचनकार अनिल झाडे, शिला बागंरे, विनोद नागपूरे, साईनाथ कोडापे, देविदास सातपुते, बालाजी रेचनकार, नामदेव सांगडे, दिपक पेंदोर, कमलेश निमगडे, अक्षय झाडे, विलास कोहपरे, महेंद्र कुनघाडकर, वासुदेव नगारे, बबलू कुडमेथे, संतोश भोयर, रोशन ठोंबरे, हितेश सरवर,नरेद्र वाघाडे आदीने नवनिर्वाचित गोंडपिपरीचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे यांचे अभिनंदन केले आहे.