गोंदिया जिल्ह्यातही मुलींनी मारली बाजी विज्ञान शाखेत वैष्णवी तर कला शाखेत रजनी प्रथम

0
17

गोंदिया,दि.३०-बारावीच्या परिक्षेत गोंदिया जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून २२हजार ४५ परिक्षाथ्र्यापैकी २२,३११९८ परिक्षाथ्र्यांनी परिक्षा दिली.त्यापैकी १९९१७ उत्तीर्ण झाले.जिल्हा निकालात जिल्हा विभागात दुसèया क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर भंडारा जिल्हा आहे.विज्ञान शाखेतील १० हजार २४८ विद्याथ्र्यापैकी ९ हजार ९१९ उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९६.७९ टक्के आहे.
तर कला शाखेत ८ हजार ८०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८४.७६ टक्केवारी आहे.वाणिज्य शाखेचा निकाल८९.८९ टक्के आहे.व्होकेशनल शाखेचा निकाल ८५.५७ टक्के एवढा आहे.
तर प्राविण्य श्रेणीत ६३८ विद्यार्थी,प्रथम श्रेणीत ६५३१ विद्यार्थी,द्वितीय श्रेणीत ११८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.निकालातही मुलींनी आघाडी घेतली असून विज्ञान शाखेत आमगाव येथील आदर्श ज्यु.कॉलेजची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे हिनें ६२१ गुण मिळवित (९५.५४टक्के)प्रथम क्रमांक पटकावला.तर कला शाखेत अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थीनी रजनी विजय शिवणकर हिने ५४५ गुण(८३.८४टक्के) मिळवित प्रथम क्रमांक पटकावला आहे.जिल्ह्यातील १३ शाळांचा १०० टक्के निकाल लागला असून एका शाळेचा निकाल १० टक्केपेक्षाही कमी लागला आहे.
जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा निकाल ८८.४४ टक्के,सालेकसा तालुका ९२.०२ टक्के,सडक अर्जुनी तालुका ९२.८३ टक्के,गोरेगाव तालुका ९०.५२ टक्के,देवरी तालुकाय ८६.२६ टक्के,अर्जुनी मोरगाव तालुका ९३.८०टक्के,आमगाव तालुका ९३.५४ टक्के,गोंदिया तालुका ८८.७१ टक्के एवढा निकाल लागला आहे.अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा निकाल ९९.०६ टक्के एवढा लागला असून विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९६.९२ टक्के लागला आहे.

वैष्णवीला व्हायचय डॉक्टर
जिल्ह्यात गुणवंत ठरलेली वैष्णवी शेंडे हिने आपल्या यशाचे श्रेय आदर्श विद्यालयातील सर्व शिक्षकांना व आई वडिलांना दिले आहे.आपण वैद्यकिय क्षेत्रामध्ये उच्चशिक्षण घेण्याची तयारी केली असून आपल्या वैद्यकिय सेवेचा लाभ सामाजिक सेवा म्हणून वापरणार असल्याचे सांगितले.सामाजिक चळवळीत आपले कुटूंब काम करीत असल्याने सामाजिक दायित्वाचे उदरनिर्वाह वैद्यकीय शिक्षणातून करणार असल्याचे सांगितले.वैष्णवीचा पालकासंह यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.