जानकीदेवी चौरागडे महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

0
12

गोंदिया दि. 2 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. सावजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित जानकीदेवी चौरागडे विज्ञान क.महाविद्यालय कुडवा गोंदियाने शंभर टक्के निकाल देऊन गोंदिया जिल्ह्यातील एक नामांकित विद्यालय आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे.
महाविद्यालयातून दिवांशू दिलीप चौरागडे ८१ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटाकावला. त्याचप्रमाणे यश धरमलाल धुवारेने ७४ टक्के घेऊन द्वितीय स्थान पटकाविले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या शाळेतील शिक्षक, आई-वडील व प्राचार्य प्रमोद चौरागडे यांना दिले आहे. महाविद्यालयात घेत असलेले उपक्रम त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी खूप कामी आले असे मत याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले. या यशाबद्दल सावजी शिक्षण संस्थेचे संस्थापक सुरेश चौरागडे, संचालिका रेखादेवी चौरागडे, माजी आ.हरिहरभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.