साकेतची तनूश्री गौतम सीबीएसईच्या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम

0
12

गोंदिया,दि.03- बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावी सिबीएसई चा निकाल शनिवारी (दि.३) जाहीर करण्यात आला. यामध्ये येथील साकेत पब्लिक स्कूलच्या तनूश्री संजय गौतम या विद्यार्थिनीने ९८.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.तनुश्रीचे शाळेचे संस्थापक चेतन बजाज,रुची गृपचे मनेजींग डायरेक्टर भालचंद्र ठाकूर यांनी तिच्या आईवडीलांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.तसेच ओबीसी संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष कैलास भेलावे,संतोष वैद्य,अजय मेंढे यांनीही तनूश्री व अंजली रेला चे अभिनंदन केले.

तनूश्री संजय गौतम हिने ९८.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर याच शाळेतील अंजली रामरतन रेला व सौम्या अजय अग्रवाल यांनी ९७.८ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविल्याबद्दल तनूश्रीचा शाळा संचालक चेतन बजाज यांच्या हस्ते पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.जिल्ह्यातील साकेत पब्लिक स्कूल, गोंदिया पब्लिक स्कूल, प्रोग्रेसिव्ह स्कूल दिल्ली पब्लिक स्कूल आदि शाळांचाही शंभर टक्के निकाल लागला आहे.प्रोगेसिव्हची सलोनी काळे हीने 97.6 टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम तर जिल्ह्यात तृतीय आली.गुंजन परयानी 97.4,दुर्गेश कुकडे 97.4 टक्के,झिन्नत सय्यद 96.8 टक्के प्राप्त केले.