ओबीसी मंत्रालयाचा कार्यभार प्रा.राम शिंदे यांच्याकडे

0
14

मुंबई, दि. 3 : जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे सध्या असलेल्या विभागांसह ओबीसी मंत्रालय ( ‘विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण’ )या विभागाचाही कार्यभार सोपविण्यात आला आहे. दिनांक ३१ मे २०१७ रोजीच्या राजपत्रात याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.