डॉ. प्रल्हाद रहांगडाले उत्कृष्ट संशोधकांच्या पुरस्काराने सन्मानित

0
11

गोंदिया,१४- आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात आमगाव येथील रसायन शास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रल्हाद के. रहांगडाले यांना उत्कृष्ट संशोधकाचा पुरस्कार देऊन आज शुक्रवारी (ता.१४) नागपूर येथे सन्मानित करण्यात आले.
नागपूर येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन (ता.१२ ते १४)करण्यात आले होते. ‘रिसेंट ट्रेंड्स इन सायंस अँड टेक्नालाजीःसस्टेनेबल डेवलपमेंट थ्रू सायंटिफिक अप्रोच‘ या विषयावर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमगाव येथील भवभूती महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. रहांगडाले यांचा उत्कृष्ट संशोधक म्हणून पारितोषिक देऊन या परिषदेत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. रहांगडाले हे भवभूती महाविद्यालयात गेल्या ३० वर्षापासून कार्यरत असून त्यांनी रसायनशास्त्र विषयात उल्लेखनीय संशोधन कार्य केले आहे.