नववीच्या पुस्तकात बोफोर्स प्रकरणाचा उल्लेख, काँग्रेस आक्रमक

0
5

नागपूर,दि.28 – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने छापलेल्या नववीच्या पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात हा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर कॉंग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूरमध्ये युवक काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या पुस्तकात राजीव गांधी यांच्याबाबत माहिती देताना, संरक्षण सामग्री आणि विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधींवर बरीच टीका झाली असं म्हटलं आहे. त्यानंतर राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांमध्ये महत्तवाचा मुद्दा बनला आणि निवडणुकामध्ये काँग्रेसचा पराभव झाला, असं या पुस्तकात म्हटलं आहे. यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्रीपदावर राहू शकले नाहीत. 1990 मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले. 1991 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे (LTTE) या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली असा उल्लेख केला आहे.