वर्धेच्या हिंदी विश्वविद्यालयात एबीव्हीपीच्या सदस्याची भंते धम्मवीरला मारहाण

0
8

वर्धा,दि.30- नेहमीच वादाच्या भोव-यात राहणा-या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात विद्यार्थ्यांचे दोन गटात वाद उफाळुन आला आहे. विश्‍वविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यास अपमानीत केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण रामनगर पोलीस ठाण्यापर्यत पोहोचले आहे. प्रकरणाचा तपास करण्या करीता पोलिसांची चमु विश्‍वविद्यालयात गेली होती. परंतु या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सध्या शहरात हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. २३ ऑगस्टच्या रात्री ९.३0 वाजता ही घटना घडली. घटनेच्या दिवशी भंते धम्मवीर बौध्द रात्रीच्या वेळी जेवण आटोपुन वस्तीगृहाकडे जात होते. याचवेळी विश्‍वविद्यालयाचे विद्यार्थी एबीवीपी विद्यार्थी संघटनेचे सदस्य चंद्रभुषण सिंग यांनी वसतिगृहाच्या गेट जवळ त्यांना अडवुन भंते धम्मवीर यांचे वस्त्र (चिवर) पकडुन शिवीगाळ करत अपमानीत केले. या घटनेची माहिती त्यांनी आपले सहकारी धम्मचारी यांना दिली. दुस-या दिवशी रात्री धम्मवीर व त्यांचे दोन सहकारी हे चंद्रभुषण यांस कारण विचारण्याकरीता गेले असता तो दारूच्या नशेत धुत होता. भंते धम्मवीर यांना म्हटले की ही आरएसएसची धरती आहे. तुमचे अपहरण करण्याची धमकी दिली.
जिल्हयात दारूबंदी असुन विकणे व पिणे कायदयाने गुन्हा असुनही विश्‍वविद्यालया सारख्या पवित्र परिसरात आरोपी विद्यार्थी दारूचे सेवन करीत असल्याचे आढळुन आले आहे. आरोपीचे वतीने बिहारी व मराठी अशा लढाईचे स्वरूप देण्यात येत आहे. चंद्रभुषण हे बिहारचे असून भंते धम्मवीर उत्तरप्रदेशचे रहिवासी आहे.रात्रीचे दरम्यान वाद वाढल्याने वार्डन लेखराज दन्नाना वस्तीगृहात आले. त्यांचे समोरही आरोपीने भंते धम्मवीर यांना शिविगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली. वार्डन यांनी धम्मवीर यांना उद्या या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. परंतु कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने भंते धम्मवीर रामनगर पोलीस ठाण्यात सहका-यांसह तक्रार करण्याकरीता गेले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता विश्‍वविद्यालयात येणार असल्याने कुलपती व प्रॉक्टरने त्यांना प्रवेश करण्यास परवानगी दिली नाही. भंते यांना अपमानीत करण्याच्या घटनेला दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.