गोंडवाना विद्यापीठ: व्हिजन आणि रोडमॅपसंबंधीचा अंतरिम अहवाल वनमंत्र्यांकडे सादर

0
24

मुंबई, दि. 8 : गोंडवाना विद्यापीठाचे व्हिजन आणि रोडमॅप यासंबंधी तयार करण्यात आलेला अंतरिम अहवाल काल वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर करण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृहात काल झालेल्या बैठकीत ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी हा अंतरिम अहवाल श्री. मुनगंटीवार यांच्याकडे सुर्पूत केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, विद्यापीठाचे कुलगुरु एन. व्ही. कल्याणकर, ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येऊ शकतील याचा सखोल अभ्यास करण्यासाठी राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी २०१६ मध्ये ऑब्झवर्हर ॲण्ड रिसर्च फाऊंडेशनची नियुक्ती केली होती. त्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विद्यापीठाला जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनवण्यासाठी कोणकोणत्या उत्तम कल्पना राबवता येऊ शकतील हे विचारात घेऊन विद्यापीठाचा दृष्टीकोन आणि त्याची भविष्यातील वाटचाल दर्शविणारा सखोल अभ्यास करून यासंबंधीचा अहवाल सादर करण्यासाठी श्री. कुलकर्णी यांना सांगितले होते.
गडचिरोली येथे २०११ मध्ये चंद्रपूर-गडचिरोलीसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठाची सद्यस्थिती,विद्यापीठाची जागा, तेथील विद्यार्थ्यांच्या गरजा, आदिवासीबहूल लोकसंख्या,  त्यांच्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा,विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, भौगोलिक अंतरामुळे निर्माण होणाऱ्या
समस्या या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून या अंतरिम अहवालात विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत.