महाराष्ट्रात 35 नव्हे तर केवळ 5 हजार कोटींचीच कर्जमाफी: राहुल गांधी

0
6

नांदेड,दि.08- मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपाच्या काळात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली, ही शरमेची बाब आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देते, भाजपाने अशी फक्त खोटी आश्वासने दिली. काळा पैसा मोदींनी स्वतः पांढरा केला.ते नांदेड येथे आयोजित मराठवाडा विभागीय काँग्रेस कार्यकर्ता मेळ्याव्यात बोलत होते.

मार्केटिंग 35 हजार कोटींची केली, मात्र कर्जमाफी फक्त पाच हजार कोटींची दिली. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी केली नाही, काही निवडक शेतक-यांची कर्जमाफी केल्याचाही घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. गेल्या काही तासांपूर्वीसुद्धा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नॅनो प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीला 65 हजार कोटी दिले असा गंभीर आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. नॅनो प्रकल्पासाठी मोदी पैसे देतात, पण शेतकऱ्यांना एक रुपया पण देत नाहीत असे राहुल म्हणाले.

राहुल गांधी यांच्या सभेला काँग्रेसचे राज्यातील सर्व दिग्गज नेते उपस्थित आहे. महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी केंदिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, राजीव सातव यांच्यासह दिग्गज नेत्यांची व्यासपिठावर उपस्थिती आहे. फक्त नारायण राणे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने दिसून येत आहे.