विज्ञान शिक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा

0
18

गोंदिया,दि.२६- राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गंत विज्ञान विषयाच्या माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था गोंदियाच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्ह्यातील २३० शिक्षक सहभागी झाले होते.प्रशिक्षणासाठी लाभार्थी माध्यमिक शाळांना प्रति शाळा ८३६ रुपये विज्ञान किट खरेदी करण्यासाठी देण्यात आले.प्रशिक्षणात कार्य आणि ऊर्जा,डीएनए रचना,विद्युत चुंबकीय प्रवर्तन,प्रकाशाचे परावर्तन व अपवर्तन आदि विज्ञान विषयातील संकल्पना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले.प्रशिक्षणास जेष्ठ अधिव्याख्यता सरस्वती सुर्यंवंशी,जिल्हा समन्वयक सुभाष मारवाडे व सहाय्यक जिल्हा समन्वयक संदिप सोमवंशी यांनी जबाबदारी पार पाडली.शारदा जिभकाटे,टी.एम.राऊत,भाष्कर बहेकार यांनी केंद्र समन्वयक म्हणून सहकार्य केले.डायटचे प्राचार्य रqवत रमतकर,जेष्ठ अधिव्याखाता राजकुमार हिवारे,डॉ.प्रदिप नाकतोडे यांचे मार्गदर्शन लाभले.