राजे धर्मराव महाविद्यालयात ग्राम स्वछतेच्या माध्यमातून गांधी जयंती साजरी

0
19

आलापल्ली, २ : अहेरी येथील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय अहेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे ग्राम स्वच्छता व प्लास्टिक निर्मुलनवर जनजागृती करुन महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रा. विजय खोंडे, प्रा. तानाजी मोरे, प्रा. सिरभैय्ये, प्रा. खोब्रागडे, प्रा. बिश्वास, शशिकांत गावंडे, दामोधर चालूरकर, जंपालवार, चंद्रकांत कोमरेवार, सुधाकर पाले आदी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य एम. के. मंडल यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना प्लास्टीक निर्मुलन ही काळाची गरज असल्याने त्याकरीता जनजागृतीची गरज असून स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी पथकाद्वारे गावातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करुन जागृतीपर रॅली काढण्यात आली. यावेळी विविध स्लोगन द्वारे प्लास्टीक व स्वच्छतेच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच प्रत्येक दुकानदारांना प्लास्टीकची विक्री न करण्याबाबत विनंती करुन त्यांना निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. उदय सरमोद्दम यांनी केले.