मुख्याध्यापक पंचभाईची शिविगाळ,वेतनपथक कार्यालय बंद

0
32

गोंदिया,दि.8-  खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या समस्या अनेक दिवसांपासून तशा प्रलंबितच आहेत.त्यातच या सर्व शाळांमधील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनाची जबाबदारी असलेले वेतन पथक कार्यालय हे महत्वाचे कार्यालय.परंतु पारदर्शक भाजप सरकारच्या शिक्षणमंत्र्यांनी गोंदियाच्या या कार्यालयात कर्मचारी अधिकारी वर्ग न दिल्याने एकाच व्यक्तीवर कार्यालय उघडण्यापासून सर्वच कामे करण्याची वेळ आली.त्यातच या कार्यालयात ज्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली ते कर्मचारी आधीच अपंग त्यातही प्रभारी कामकाज असताना स्वतःच कार्यालय उघडणे,साफसफाई करुन जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे वेतन तयार करण्यासह इतर कामे करण्याची जबाबदारी सांभाळत असताना मदतीसाठी म्हणून काही शाळेतील शिक्षकांची मदत घेतली.त्यातच गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील संजय गांधी हायस्कुलच्या एका शिक्षकाची मदत सुध्दा आॅनलाईन वेतनासाठी घेण्यात आली.त्या शिक्षकाला परत द्या,कार्यमुक्त करा अशी मुख्याध्यापक प्रकाश पंचभाई यांची मागणी.परंतु शिक्षण विभागाने त्यांना न सोडल्याने त्याचा राग मुख्याध्यापक पंचभाई यांनी वेतनपथक कार्यालयात शुक्रवारला सायकांळी साडेपाच वाजताच्या सुमारास जाऊन अधिक्षक रहागंडाले यांना अश्लिल अशा शिविगाळ केल्या. सोबतच शासकीय कामात अडथळा निर्माण केला.या झालेल्या प्रकरणाची माहिती लगेच वरिष्ठांना देत आपल्या जिवाला धोका असल्याचे गृहीत धरुन त्यांनी शनिवारला कार्यालय बंद करण्यासंदर्भातले नोटीस लावल्याने एैनदिवाळीच्या वेळेस एका मुख्याध्यापकाच्या अरेरावीमुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे वेतन रखडल्याने दिवाळी विनावेतन होते की काय  या शंकेने शिक्षकामध्ये वातावरण तापले गेले आहे.