संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून उचलबांगडी

0
6

मुंबई ,दि.24-  मुंबई विद्यापीठाच्या निकालांना झालेला विलंब अखेर कुलगुरू संजय देशमुख यांना भोवला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी संजय देशमुख यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतल्याने मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीमध्ये प्रचंड गोंधळ झाला होता. या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठाने यावर्षी घेतलेल्या परीक्षांचे निकाल लागण्यास प्रचंड विलंब झाला. पेपरतपासणीमध्ये झालेला गोंधळ आणि निकालांना झालेल्या उशिरामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात कुलगुरू सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे देशमुख यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्यपालांनी संजय देशमुखयांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांना कुलगुरूपदावरून हटवले.