नवनिर्वाचित सरंपचाला बदनाम करण्याचा विरोधकांचा षडयंत्र

0
12

गोरेगाव,दि.०७-तालुक्यातील कटंगी येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर इतर पक्षांचे सुध्दा लक्ष लागले होते.त्या निवडणुकीत तेजेंद्र हरिणखेडे यांनी विरोधीगटाच्या उमेदवाराचा पराभव करीत सरपंच पदी विजयी ठरले.दरम्यान गावातील त्यांच्या विरोधकांनी एका महिलेला हाताशी धरुन हरिणखेडे यांच्याविरुध्द गोरेगाव पोलीसात तक्रार नोंदविल्याने गावातील नागरिकांनी त्रीव रोष व्यक्त नोंदवित पोलीस ठाणेच गाठले.व याप्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी महात्मा गांधी तंटामुक्त समितीने चौकशीची मागणी करीत चुकीचा आरोप लावणाèयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.अन्यथा पोलिसांच्या विरोधातच आंदोलन करण्याचा इशारा दिला.सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार २ नोव्हेंबरला सरपंच तेजेंद्र हरिणखेडे हे बाजार समिती व खरेदी विक्रीचे संचालक डेमेंद्र रहागंडाले,दिलराज qसगाडे,रुपेंद्र दिहारी,प्रेमलाल भगत,सुरेश चौधरी यांच्यासोबत जि.प.सभापती पी.जी.कटरे यांना भेटायला गेले.ते त्यादिवशी दिवसभर जिल्हापरिषदेत असताना गावातील एका महिलेने गोरेगाव पोलिसात हरिणखेडे यांच्याविरुध्द खोटी तक्रार दाखल केली.ज्याआधारे पोलीसांनीही चौकशी न करता गुन्हा दाखल केला.गावातील नागरिकांना या प्रकरणाची माहिती मिळताच नाराजी व्यक्त करत हरिणखेडे गावातच हजर नसताना त्या महिलेला शिविगाळ कसे करु शकतात,तेव्हा पोलिसांनी सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचे निवेदन ठाणेदारांना सादर केले.निवेदन देतेवेळी नोजेंद्र भगत,गेंदलाल बोपचे,शाम रहागडांले,धोंडू हरिणखेडे,टेकू रहागंडाले,श्रावण हरिणखेडे आदी गावकरी हजर होते.तर गावतंटामुक्त समितीने गावात शांतता टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसात दाखल करण्यात ये नये असा ठराव पारीत करीत महिलेच्या तक्रारीवर चौकशी करतांना पोलीस पाटील व तमुसशी संपर्क करुन सत्यता तपासावी असेही म्हटले आहे.तर हरिणखेडे यांनी आपला सदर महिलेशी माझे बोलने झाले नसून गावातील माझ्या विरोधकांनी रचलेला डाव असल्याचे म्हटले आहे.तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डेमेंद्र रहागंडाले यांनी गावातील शांतता भंग करणाèया व खोटी तक्रार नोंदविण्यासाठी सल्ला देणाèयांचीही चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी केली आहे.