अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

0
14

नागपूर,दि.29 : भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या  वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर – अमरावती राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक – ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर आज शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.
या परिसरात बोर व्याघ्र प्रकल्प असून, कळमेश्वर तालुक्यातील जंगली भाग लागूनच आहे. त्यामुळे या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ व बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान, ही वाघीण सायंकाळी राष्ट्रीय  महामार्गावरील घुलीवाला पूल ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आलोकर आणि कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तिचे वय पाच ते सहा वर्षे असल्याची माहिती आलोकर यांनी दिली.