परशुराम विद्यालयाच्या स्नेहसमेलंन अपूर्व विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन

0
26
गोरेगाव,दि.०४ः- परशुराम शिक्षण प्रसारक संस्था गोरेगावद्वारा संचालित परशुराम विद्यालय मोहगाव(बुं)च्या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसम्मेलनांचे आज गुरुवार ४ जानेवारीला थाटात उदघाटन करण्यात आले.संस्थेचे सचिव माजी खासदार डॉ.खुशालचंद्र बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रप्रमुख के.टी.पटले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तमुसअध्यक्ष खेमराज बेदरे,  सेवा सहकारी संस्था अध्यक्ष हुमराज बावनकर, माजी सरपंच कमलेश रहागंडाले आदी मान्यवर उपस्थित होते.पाहुण्यांच्या हस्ते स्नेहसमेलनाचे व अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.प्रास्तविक मुख्याध्यापक बी.डब्लू.कटरे यांनी केले. संचालन पी.व्ही.पारधी यांनी तर आभार पी.एम.चुटे यांनी मानले.आयोजनासाठी स्नेहसमेलन प्रभारी पी.एम.चुटे,सांस्कृतिक प्रभारी डी.डी.चौरागडे,सहप्रभारी कु.भारती बिसेन,क्रिडा प्रभारी व्ही.एस.मेश्राम,सहप्रभारी बी.सी.गजभिये,बौध्दिक स्पर्धा प्रभारी टी.एफ.इळपाचे,कु.ममता गणवीर,एल.आय.बोपचे,पि.व्ही.पारधी,के.बी.पारधी,डी.एम.बोपचे,अंकुश घरडे,केदार बावनकर,दिनदयाल राणे,दिशा रणदिवे,आचल पटले,दिनेश वाढई,प्रिया बावणे व खुशबू रसनकुटे यांनी सहकार्य केले.