मूलभूत व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार- नगराध्यक्षा मैथली कुलकर्णी 

0
9
 नांदेड ( सय्यद रियाज ) ,दि.5 बिलोली  नगर परिषद शाळा येथे काँग्रेस  नगरसेवक मिर्झा शाहेद बेग ईनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला ०६ सिलींग पंखे देण्यात आले .
बिलोली तालूक्यातील सर्वात जूनी नगर परिषद शाळा अशी ओळख असलेली शाळा आहे परंतु सदर शाळेत भौतिक  सुविधा अपुऱ्या आहेत वर्ग खोल्या आहेत पण पंखे नाहीत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटाई नाहीत शिक्षकांना बसण्यासाठी खुर्ची नाहीत तसेच शाळेला संरक्षक भिंत नाही सदर बाब लक्षात घेऊन शाहेद बेग यांनी शाळेला ०६ पंखे देऊन वाढदिवसाची भेट दिली व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना चाँकलेट देण्यात आले .
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती बिलोली नगर परिषद च्या नगराध्याक्षा सौ.मैथीली कुलकर्णी बिलोली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार , बिलोली पोलिस ठाणे चे पोलिस निरीक्षक भगवान धबडगे , डाँ.केंचे व नगर परीषद चे  अभियंता देशमुख ,  पालीकेचे कर्मचारी चव्हाण ,  वलिओद्दीन फारुखी, सेवक जाविद कुरेशी ,अमजद चाऊस, शेख फारुख अहेमद ,अध्यक्ष शेख सुलेमान ,रहिम कुरेशी , सय्यद रियाज , जामा मशिद चे मौलाना अहेमद बेग , महेंद्र् गायकवाड , मन्सुर बेग,शाहेद पटेल यांची उपस्थिती होती .या कार्यक्रम चे सूञसंचलन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत बार्टी पूणे तर्फे कार्य करणारे  शेख इर्शाद मौलाना यांनी केले व  सर्व विद्यार्थ्यांना  मौलाना अहेमद बेग व वैद्यकीय अधिक्षक डाँ.लखमावार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास हा शालेय जीवनातच होत असतो त्या अनूषंगाने जास्तीत जास्त महत्त्व व्यक्तीमत्व विकासावर दिले पाहिजे . पोलिस निरिक्षक भगवान धबडगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मी स्वता दोन वर्ष शिक्षक या पदावर काम केलेले आहे  प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या  वाढदिवसाला सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवावे .जेणेकरुण समाजामध्ये सामाजिक व शैक्षणिक दर्जात सुधारणा घडवून आणता येईल असे उपक्रम राबविले पाहिजे व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व या  विषयावर सखोल मार्गदर्शन केले .तसेच नगर परिषद च्या अध्यक्षा सौ.मैथीली कुलकर्णी यांनी आश्वासन दिले की शाळेला  मूलभूत व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल . सदर कार्यक्रम यशस्वी ते साठी शाळेचे सहशिक्षक टि.जी.सय्यद व पि.जाधव व सहशिक्षिका नसीमा बानो व अजीजा सिद्दीखी व नजमा बेगम यांनी परिश्रम घेतले तसेच शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती एल.व्हि .तोटोड यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.