५ पटसंख्येची शाळा सुरू ११ पटसंख्येची शाळा बंद

0
6
गोंदिया जि.प.शिक्षण विभागाचा प्रताप
गोंदिया,दि.०६ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातंर्गत शासन निर्णय व शिक्षणाचा अधिकार कायद्याचे कसे हनन केले जाते याचे उदाहरण गोरेगाव पंचायत समितीअंतर्गत शाळामध्ये बघावयास मिळाले.गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कुèहाडी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरटोला येथील विद्यार्थी संख्या ५ असतानाही शाळा सुरू आहे.तर ११ विद्यार्थी संख्या असणारी गराडा येथील प्राथमिक शाळा मात्र शिक्षण विभागाने बंद केल्याने शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवरच शंका निर्माण झाली आहे.शासन निर्णयानुसार १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाèया शाळा बंद करुन त्या विद्याथ्र्यांसह शिक्षकांना नजीकच्या शाळेत समायोजित करावयाचे आहे.त्यानुसार गोंदिया जिल्हा परिषदेने ३२ शाळा समायोजित करण्यासाठी निवडल्या.त्यानुसार ३ जानेवारीला २८ शाळांना शिक्षण विभागाने कुलूप ठोकले.त्यापैकी १० पेक्षा अधिक संख्या असणाèया शाळेला सुध्दा कुलूप लावत शाळा बंद केली,त्यामध्ये गोरेगाव पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या गराडा येथील शाळेचा समावेश आहे,जिथे ११ विद्यार्थी संख्या आहे.तर दुसरीकडे याच पचांयत समितीने मात्र ५ विद्यार्थी संख्या असणारी हिवरटोला शाळा जिथे वर्ग १ ते ४ घेतले जातात ती मात्र कायम ठेवली आहे.जेव्हा की नियमानूसार ही शाळा ंबंद करावयाची असताना ११ विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेला बंद केल्याने शिक्षण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.