ओबीसींची शंभर टक्के शिष्यवृत्ती जमा करा-ओबीसी महासंघाचे निवेदन

0
10

चंद्रपूर,दि.17 : शासनाने ३० जानेवारीला जारी केलेला अध्यादेश रद्द करुन शंभर टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मगास प्रवर्ग कल्याण विभागाने ३० जानेवारीला नव्या अद्यादेश जारी केला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यात मंजूर झालेल्या ५० टक्के रक्कमेच्या ६० टक्के रक्कम म्हणजेच ३० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हा निर्णय ओबीसी विद्यार्थ्यांना अन्यायकारक आहे. सामाजिक न्याय विभागाने शंभर टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला.त्याचप्रमाणे ईमाव,विजाभज(ओबीसी)मंत्रालयाने सुध्दा 100 टक्के रक्कम विद्यार्थ्यांना द्यावी अन्यथा आंदोलनात्मक प्रवित्रा घेण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
तसाच निर्णय ओबीसी मंत्रालयाने घेऊन शासनाचा ३० जानेवारीचा अद्यादेश रद्द करुन शंभर टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकारीमार्फंत मुख्यमंत्र्यांना पाठविले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, समन्वय प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, बबनराव फंड, रविंद्र टोंगे, संजय देवाळकर, जितेंद्र भोयर, प्रवीण चवरे,अविनाश टोंगे,सचिन भिलकर,रवि लोणकर,निलेश वैद्य,प्रणय काळे,कार्तिक ठाकरे,अनिल दखने,रोहित बगूलकर,आकाश गंडाटे,प्रमय गडाटे आदी उपस्थित होते.