सत्यपाल महाराजांची फटकेबाजी

0
31
संत चोखोबा नगरी, दि.१७ः  येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आयोजित ७ व्या अखिल भारतीय संत साहित्य समेलनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र  फडणवीस यांच्या हस्ते प्रबोधनकार किर्तनकार सत्यपाल महाराज यांना शासनाचा पहिला संत चोखोबा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना सत्यपाल महाराजांनी आपल्या खुमासदार शैलीत प्रेक्षकांना रिझवून ठेवत चांगलीच फटकेबाजी केली.
हा पुरस्कार स्विकारण्याअगोदर,माझ्या गावातसुद्धा मला एक रूपयाही मिळत नव्हता,मात्र,देवेंद्राच्या कृपेमुेळे पहिल्यांदा ५१ हजार रूपयाचा पुरूस्कार जाहीर झाला.
आधी  नरेंद्र खाली देवेंद्र,शेवटी  दरिद्र शेतकरी,अशी आपल्या विनोदी शैलीत बोचरी टीका करीत सरकार आणि शेतकर्यांमधील चित्राचे संक्षिप्त विवरण केले.
आपल्या आमदारांची नावेच विचित्र असून जसे फुके मारणारे फुके यांनी  फुक मारली अन् आमदार झाले. सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यां नी कधी मच्छर नाही ते वाघ कसे मारणार.अशी उपहासात्मक टिकी केली. एक आमदार तर माझ्या वाढदिवसालाच किर्तनाला या असे पुराम म्हणाले राम नाही,त्यातच तिरोड्याचे रहागंडाले हे काय आडनाव मिश्कील पणा करीत हास्य पिकविले.
 माझ्या मायची डिलेव्हरा पाच मिनीटात होवून सत्यपाल नावाचा असा जबरदस्त हॅण्डसेट बाहेर आला. माझ्या पांडुरंगांनी १८ जातीच्या लोकांना ऐकत्र आणले. मात्र, तुम्ही आम्हाले  हलकट समजले तर तुमची ब्लुफिल्म बनवू. माझ्या बायकोचे देहदान केले, वडीलाचे नेत्रदान केले. आता ज्या जिल्ह्यात मी मरेन त्याच जिल्ह्याच्या मेडीकल कॉलेजला मी  देहदान करणार.  बायानो बांगड्या फोडू नका, सातबारा जाळून दाखवा. मात्र, देशात सर्वत्र, बांगड्या फोडून कपडे जाळतात.  सामाजिक न्यायमंत्र्यावर मुख्यमंत्र्याचे आय लव्ह आहे. म्हणून ते आले. असे आपल्या विनोदी शैलीत सांगून चौपेâर फटकेबाजी करून संत चोखोबा नगरीत हास्याचे फवारे उडविले.