पुण्यातील एसपी कॉलेजच्या प्राचार्यांना अटक

0
19

पुणे- प्रसिद्ध सर परशुरामभाऊ महाविद्यालय म्हणजेच एसपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांना आज पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह कॉलेजमधील तिघांना अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.
पुण्याच्या समाजकल्याण विभागाने डॉ. दिलीप शेठ यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार दिली होती. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतल्याने शेठ यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी 2012 मध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. दिलीप शेठ यांच्यासह तिघांना पुण्यातील कोर्टात सादर केले जाणार आहे. त्यानंतर पोलिस किंवा न्यायालयीन कोठडीचा निर्णय घेतला जाणार आहे.