जेईई व नीट परीक्षा वर्षांतून दोनदा होणार

0
15

नवी दिल्ली,दि.07(वृत्तसंस्था)- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जेईई व नीट परीक्षा वर्षांतून दोनदा होणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केला आहे. जेईईची परीक्षा जानेवारी आणि एप्रिल महिन्यात घेतली जाणार आहेत. तर नीटची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. विद्यार्थ्यांना दुस-यांदा संधी मिळावी या हेतूनं परीक्षा दोनदा घेण्याचे ठरवले आहे, असंही जावडेकर म्हणाले आहेत.