डॉ. अक्षत अग्रवाल ठरले गोंदियाचे पहिले बाल दंतरोगतज्ज्ञ

0
88

गोंदिया,दि.01 : धुळे येथील पाटील डेंटल कॉलेजमधून बी.डी.एस. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर डॉ. अक्षत गोपाल अग्रवाल यांनी वर्धा येथून शरद पवार डेंटल कॉलेजमधून एम.डी.एस. परीक्षा मेरीटमध्ये येऊन तृतीय स्थान प्राप्त करून गोंदिया शहराचे नाव उंचाविले. तेव्हा ते आता गोंदिया जिल्ह्याचे पहिले बाल दंतरोग तज्ञ ठरले आहेत. डॉ. अक्षत अग्रवाल यांनी आपल्या शैक्षणिक कार्यकाळात अनेक राष्ट्रीय सेमीनारमध्ये पेपर प्रेझेंटेशनमध्ये पुरस्कार प्राप्त केले आहेत. इंडियन सोसायटी ऑफ पेडोडान्टीस अ‍ॅण्ड प्रिवेंटिव डेनटिस्ट्री हैद्राबाद, कोच्ची, चेन्नईमध्येसुद्धा त्यांचा गौरव करण्यात आला.त्यांच्या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.