गोसलिया कॉलेज मिरज येथे अमित पाटील यांचा सत्कार

0
12

सांगली,दि.28ः-श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन मिरज येथे कॉलेजचे माजी विद्यार्थी अमित गणपती पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्ती अमित पाटील यांनी मनोगतामध्ये डीएड अभ्यासक्रमाच्या व येथील गुरुजनांचा यशामध्ये महत्त्वाचा वाटा असल्याचा उल्लेख करीत अभ्यासासाठी जिद्द चिकाटी बरोबर मार्गदर्शनाची आवश्‍यक असते असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेल्या सुमन वांगीकर यांनी अध्यापक विद्यालयातील गुरुजनांनी केलेल्या संस्काराची आठवण ठेवून भावी वाटचाल करावी असा संदेश दिला. प्राचार्य गौतम शिंगे यांनी अध्यक्षीय भाषणात अमित पाटील यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत अध्यापक विद्यालयातील छात्राध्यापकांनी अमित पाटील यांचा आदर्श समोर ठेवून स्पर्धापरीक्षांमध्ये यश संपादन करावे असे म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटील एस .जे यांनी केले.व्ही.व्ही. माने यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यु.जी. पांढरे केले.यावेळी माजी विद्यार्थी हनुमंत सरगर अमर पालखे राहुल गुडीमणी साजिद मुजावर गणेश तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.