28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक शिवाजीनगर शाळेत भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार

शिवाजीनगर शाळेत भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार

0
147

तासगाव(सांगली),दि.15ः-मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे व प्रत्यक्ष आठवडी बाजारात कशा पद्धतीने व्यवहार चालतात याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या हेतूने सहशालेय उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक बारा जानेवारी रोजी शिवाजीनगर शाळेत सकाळी आठवडी बाजार भरवण्यात आला.यावेळी पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.यावेळी सावळज जि.प.गटाचे जि. प.सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील,पंचायत समिती सदस्या  मनिषाताई माळी, सरपंच योगेश(दादा) पाटील,माजी सरपंच हेमंतभाऊ पाटील, माजी उपसरपंच  अनिल(भाऊ) थोरात, ग्रामपंचायत सदस्या सौ.किरण (ताई) थोरात,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार ढवळे,उपाध्यक्ष दादासाहेब पडळकर, शिक्षण तज्ञ बाळासाहेब जाधव, शिक्षण प्रेमी व प्रगतशील बागायतदार बी. एस. पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका पार्वती कुंभार,शिक्षक रेवणसिध्द होनमोरे,सर्व पालक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.