तिरोडा तहसील कार्यालयासमोर परिक्षा केंद्रासाठी धरणे आंदोलन मंगळवारला

0
8

गोंदिया,दि.२१: तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सुकडी/डाक येथील इयत्ता १२ वीचे परिक्षा केंद्र नागपूर विभागीय परिक्षा मंडळाने बंद केल्याने त्या निर्णयाच्या विरोधात उद्या(दि.२२) मंगळवारला तिरोडा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने जिल्ह्यातील जि.प. कनिष्ठ महाविद्यालय सुकडी/डाक येथील एचएससी परीक्षा केंद्र क्र.७७० बंद केले असून ते सुरु करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी व शालेय शिक्षक पालक समितीच्यावतीने आमदार विजय रहागंडाले यांची भेट घेऊन निवेदन सुध्दा सादर करण्यात आले.त्यानंतर आमदार रहांगडाले यांच्या पत्रासोबतच केंद्र सुरु करण्याचे निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालकांना माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नागपूर येथे जाऊन दिले.तरी त्या निवेदनावर गांर्भीयाने लक्ष न देता शिक्षण मंडळाने केंद्र बंद ठेवण्याचेच धोरण स्विकारल्याने विद्यार्थी व पालकांनी तसेच या केंद्रावर नियमित विद्यार्थी परिक्षेला बसविणाèया शांळानी आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे.त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे नागपूर विभागीय मंडळाच्या विरोधात जि.प. हाय. व कनिष्ठ महाविद्यालय सुकडी/डाक, इंदिरा गांधी कृषी महाविद्यालय ठाणेगाव, श्रीमती अंज़नाबाई पारधी कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव/ख.च्यावतीने विशाल धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.