लाखेश्वर लंजे शिक्षक सम्मान पुरस्काराने सम्मानित 

0
12

अर्जुनी मोरगाव,दि.२१: बीसीपीटी चाईल्ड राइट अलायन्स अपेक्षा होमियो सोसायटी व स्वच्छ बहुउद्देशिय संस्था अमरावतीच्या संयुक्त वतीने इंग्लीश ई-टीच प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील २२ शाळांमध्ये राबविला जात असून या उपक्रमात चांगले कार्य केल्याबद्दल अर्जुनी मोरगाव पंचायत समितींतर्गंत येत असलेल्या प्राथमिक शाळा इंजोरीचे शिक्षक लाखेश्वर लंजे यांचा शिक्षक सम्मान पुरस्कारने गौरव करण्यात आला आहे.
गुरुकुंज मोझरी येथे आयोजित शिक्षक सम्मान पुरस्कार सोहळ्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.के.एम. कुलकर्णी यांच्या हस्ते शिक्षक सम्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.आदिवासीबहूल अशी ओळख असलेल्या अर्जुनी/मोर तालुक्यातापासून १० किमी अंतरावरील इंजोरी शाळेचे मुख्याध्यापक रोकडे,शिक्षक लाखेश्वर लंजे यांनी शाळेतील वातावरण बालमैत्रीपूर्ण ठेवत इंग्रजी विषयात विद्याथ्र्यांना जास्तीत-जास्त आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबविले. तसेच सामाजिक एकोपा कायम टिकविण्यासाठी त्यानी केलेल्या कार्याची दखल उपक्रमाच्यावतीने घेण्यात आली.