शिक्षक संघाच्या प्रलंबित समस्या निकाली काढा

0
13

चामोर्शी,दि.19ःःजिल्ह्यातील रिक्त असलेली उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदविधर, विषय शिक्षक यांची रिक्त पदे तत्काळ भरावी यासाठी विविध मागण्या निकाली काढण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने प्राथ. शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांचा नियमित व स्थायीचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्यात यावे, सर्व संवर्गातील शिक्षकांना १२ व २४ वर्षानंतर चटोपाध्याय तसेच निवड श्रेणीचा लाभ विनाअट देण्यात यावा, २00५ नंतर लागलेल्या डीसीपीएस धारक शिक्षकांच्या कपातीचे विवरण संबंधित शिक्षकांना तत्काळ देण्यात यावे, शाळेच्या विद्युत बिलासाठी वेगळा निधी जि.प. फंडातून उपलब्ध करून देण्यात यावा, अपघात विमा योजनेच्या नोंदी सेवापुस्तकाला घेण्याबाबत पंचायत समितींना योग्य निर्देश देण्यात यावे, शासन निर्णयानुसार ७ व्या वेतन आयोगाचा लाभ माहे जानेवारी २0१९ व फेब्रुवारी २0१९ चे थकबाकीसह माहे मार्च २0१९ च्या वेतनात देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देताना महा.राज्य प्राथ.शिक्षक संघाचे मा.जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, कार्याध्यक्ष-शिलाताई सोमनकार,सरचिटणीस आशिष धात्रक,कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार,उपाध्यक्ष अशोक रायसिडाम, सुरेश वासलवार, जिल्हा सल्लागार निळकंठ निकुरे, गडचिरोली तालुकाध्यक्ष धनेश कुकडे, कार्याध्यक्ष संजय मडावी, धानोरा तालुकाध्यक्ष राजु मुंडले उपस्थित होते.