चंद्रपूरातील सैनिक शाळा प्रवेशातूनही ओबीसींना डावलले

0
41
गोंदिया,दि.19ः- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड येथील सैनिक स्कूलमधील इयत्ता ६ वीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी(वर्ष २०१९-२०) येत्या २१ एप्रिल रोजी होणाèया अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परिक्षेस पात्र मुलाकंडून ९० जागासांठी अर्ज मागविण्यात आले. मात्र या ९० जागामध्ये ओबीसीसाठी मंडल आयोगानुसार २७ टक्के जागा आरक्षित न करता ओबीसीवर अन्याय केल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे ओबीसी हितासाठी आम्ही खूप काही केल्याचा गवगवा करणाèया सरकारला या सैनिकी शाळेत ओबीसींनाही त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावेसे वाटले नाही हे प्रकाशित जाहिरात व शिक्षण विभागाच्या पत्रावरुन दिसून येत आहे.त्यामुळे ओबीसी विद्याथ्र्यांसाठी जागा राखीव न ठेवल्याने विदर्भातील एकमेव शासकीय सैनिकी शाळेतील प्रवेशापासूनही ओबीसी प्रवर्गाचा विद्यार्थी वंचित राहणार आहे.
९० जागामध्ये १५ टक्के जागा अनुसूचित जातींसाठी,७.५ टक्के अनुसूचित जमातीसाठी तर उरलेल्या जागामधून ६७ टक्के जागा महाराष्ट्रातील मुलासांठी तर ३३ टक्के इतर राज्य व केंद्रशासीत प्रदेशातील मुलासांठी राखीव ठेवण्यात आले.त्यातही महाराष्ट्र व इतर राज्यातील राखीव जागामधील २५ टक्के जागा या आजी माजी सैनिकांच्या मुलासांठी राखीव करण्यात आल्या आहेत.चंद्रपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाèयांना पाठविलेल्या पत्रात जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड येथील सैनिक शाळा प्रवेशासाठी जनजागरण करावे असे म्हटले आहे. सैनिक स्कुल प्रवेशामध्ये ओबीसी प्रवर्गाला केंद्र व राज्य सरकारने डावलून आपली ओबीसी विरोधी भूमिका स्पष्ट केल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केला आहे.