प्रोग्रेसिव्ह सीबीएसई शाळेच्या निकाल ९५ टक्के

0
14

गोंदिया,दि.03ः-सीबीएसई बोर्डाद्वारे फेब्रुवारी २0१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत येथील उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह सीबीएसई शाळेच्या निकाल ९५ टक्के लागला आहे.सीबीएसई बारावीच्या परीक्षेचा निकाल  २ मे रोजी प्रसिध्द झाला. यात शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी बांगरे हिने ९२.४ टक्के गुण मिळवून प्रथम, गुंजन परयानी हिने ९२.६ व सलोनी काळे ८९ टक्के गुण मिळवून अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार, प्राचार्य ओ. टी. रहांगडाले, प्राचार्य कुमुदिनी तावाडे, निधी व्यास, विणा कावळे, मिनाक्षी महापात्रा, आशा राव, वर्षा सतदेवे, अभय गुरव, कुलदीप भौतिक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.