लिटिल फ्लावर शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

0
33

लाखनी,दि. १९ः-फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत द लिटिल फ्लावर इंग्लिश स्कुल लाखनी येथील एकूण १६ विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धेत पात्र ठरत घवघवीत यश मिळवले आहे. पूर्व उच्च माध्यमिकमध्ये अंशुल बोरकर, युतिका बोधनकर, युक्ती पुडके, रुजुलास्था गजभिये, पेजल भूरे, प्रेरणा डहाट, आर्यन खोब्रागडे, कावेरी तीतिरमारे, अपूर्वा लामकाने, नोहाश्री कमाने, मेहविश शेख, अपूर्वा पाल हे विद्यार्थी पात्र ठरले असून पूर्व उच्च प्राथमिकमध्ये श्रुती गभणे, तनिष्क खेडीकर, अनिकेत धरमसारे, विश्वेश गभणे हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या उज्वल यशाची परंपरा याही वर्षी विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे. अंशुल बोरकरने प्रथम तर युतिकाने द्वितीय क्रमांक पटकावला.
प्राचार्य कल्पना भोयर, शाळा सचिव संजय वनवे, विश्वस्त महेंद्र राऊत, शिक्षक आशीष बडगे, वर्षा बांते, प्रशांत वाघाये, विशाल हटवार, अंजली काणतोडे, अनमोल भोयर, प्रतिक्षा बंसोड, प्रिया ठाकरे तथा सर्व शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.