विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ३ जूनला ‘विशाल वीज मार्च’

0
23

गडचिरोली,दि.१९:-विदर्भातील वीज दर निम्मे करावे, विदर्भ प्रदूषणमुक्त करावा, १३२ नवीन प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द करावे, ग्रामीण भागातील शेतीपंपाचे १२ ते १६ तासांचे भारनियमन संपवून २४ तास पूर्ण दाबाची वीज द्यावी, शेतकर्‍यांना कृषीपंपाच्या वीज बिलातून मुक्त करावे या व इतर मागण्यांसाठी ३ जून रोजी दुपारी १२ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर येथील संविधान चौक ते वीज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानापर्यंत ‘विशाल वीज मार्च’चे व त्यानंतर त्याचठिकाणी ठिय्या आंदोलनाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले व पदाधिकार्‍यांनी १८ मे रोजी स्थानिक प्रेसक्लब भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला गडचिरोली जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे, विदर्भ प्रदेश महिला अध्यक्षा रंजना मामर्डे, गडचिरोली महिला तालुकाध्यक्षा अमिता मडावी, प्रतिभाताई चौधरी, मनिषा तामशेटवार, रमेश उप्पलवार, गुरूदेव भोपये उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना नेवले यांनी सांगितले की, विदर्भात ४१०० मेगावॅट वीज शिललक असतानासुध्दा विदर्भातच सरकार पुन्हा १३२ नवीन कोळसा आधारित वीज प्रकल्प आणूनत्याव्दारे ८६४०७ मेगावॅट वीज तयार करणार आहे. ही वीज दिल्ली-मुंबई इंडस्टड्ढीयल कॉरिडॉरकरीता पाठविणार आहे. त्यासाठी अधिकचे वीज उत्पादन करणार आहे. हा प्रकल्प विदर्भात झाला तर काय होईल? विदर्भाचा विनाश होईल.
महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणार नाही, शेतकर्‍यांना वीज नाही, विजेचे भारनियमन संपणार नाही, वीज बिल दुप्पट होणार, वीज प्रकल्पामुळे संपूर्ण विदर्भ प्रदूषित होऊन विदर्भाची राखरांगोळी होणार आहे. हा सर्व तोटा आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य. विदर्भातील सर्व जनतेचे झोपडपट्टी, शेतकर्‍यांपासून तर व्यापारी, उद्योजक, कारखानदार या सर्वांचे विजेचे दर निम्मे झालेच पाहिजे, विदर्भातील जीवघेणे १३२ प्रस्तावित वीज प्रकल्प रद्द करून जे वीज निर्मिती प्रकल्प सध्या आहेत, त्याचे प्रदूषण टप्याटप्प्याने कमी करून वीजेपासून प्रदूषण मुक्त विदर्भ करावा, ग्रामीण भागातील शेतीपंपाचे १२ ते १६ तासांचे भारनियमन बंद करून २४ तास वीज पुरवठा करावा, शेतकर्‍यांना कृषीपंपाच्या वीज बिलातून मुक्त करावे आदी मागण्यांसाठी ३ जून रोजी दुपारी १२ वाजता नागपूर येथील संविधान चौक ते वीजमंत्री बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानापर्यंत ङ्कविशाल वीज मार्चङ्ककाढण्यात येणार आहे. विदर्भातील सर्व जनतेचे या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही आवाहन नेवले यांनी पत्रकार परिषदेतून केले.