बारावीच्या निकालात जिल्हा विभागात अव्वल,सिया ठाकूर जिल्ह्यात प्रथम

0
32

– ५० शाळांचा शंभर टक्के निकाल
गोंदिया,दि.२८ः- महाराष्ट्र राज्य माध्यमीक व उच्च माध्यमीक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर मंगळवारी २८ मे रोजी जाहीर झाला. या निकालात गोंदियाच्या गुजराती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी सिया धनेंद्र ठाकूर हिने ९५.८४ गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तर याच महाविद्यालयाचा विद्यार्थी श्रीकांत देशपांडे याने ९५.४० टक्के तर सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी-मोर ची विद्यार्थीनी सोनल साखरे हिने ९५.३८ टक्के गुण घेत अनुक्रमे द्वितीय व तृतिय येण्याचा मान मिळविला. तर कला शाखेत सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी-मोरच्या पियूष कैलाश शहारे याने ८९.३८ टक्के गुण घेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. जिल्ह्यात निकालाची टक्केवारी ८७.९९ टक्के असून जिल्ह्याने विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
जिल्ह्यात एकूण १९ हजार ८४१ विद्याथ्र्यांनी परिक्षेसाठी अर्ज केले होते. ज्यापैकी १९ हजार ८२८ विद्याथ्र्यांनी परिक्षा दिली. यात १७ हजार ४४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी कमी असली तरी जिल्हा विभागात प्रथम आला आहे. यंदा परिक्षेला बसलेल्या १९ हजार ८२८ विद्याथ्र्यांमध्ये ९९१२ मुले तर ९९१६ मुलींचा समावेश होता, यापैकी १७ हजार ४४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ८5५४ मुले (८६.३० टक्के) तर ८८९३ मुली ( ८९.६८ टक्के) यांचा समावेश आहे.तर पुर्नपरिक्षेला ६५५ मुले व ३३८ मुली परिक्षेला बसले होते.त्यापैकी १५७ मुले व ९४ मुली उत्तीर्ण झाल्या.
जिल्ह्यात पन्नास शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून पाच शाळांचा निकाल हा ५० टक्क्यांपेक्षा कमी लागला आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहिर होताच पालकांनी इंटरनेट कॅफे वर एकच गर्दी करताना दिसले. तर ग्रामीण भागात काही विद्याथ्र्यांना निकाल बघायला थोडी अडचण निर्माण झाली असल्याचे दिसून आले. 100 टक्के निकाल देणार्या काही शाळामध्ये धोटे बंधु विज्ञान महाविद्यालय ९७.४७,एस.एस.गल्स कॉलेज ८३.७२,जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज एकोडीचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.०३ टक्के लागला आहे,जीईएस कामठाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के,विमलताई ज्यु.कॉलेज कटंगीकला विज्ञान शाखा १०० टक्के,जीईएस पांढराबोडी विज्ञान शाखा १०० टक्के,अर्चना पी कन्या ज्यु.कॉलेज दासगाव विज्ञान शाखा १०० टक्के,शासकीय आश्रमशाळा मझीजपूर १०० टक्के,राष्ट्रीय विद्यालय सतोना विज्ञान शाखा १०० टक्के,शांताबेन मनोहरभाई पटेल ज्यु.कॉलेज गोंदिया १०० टक्के,विवेक मंदीर गोंदिया १०० टक्के,शंकरलाल अग्रवाल क.महा.बिरसोला विज्ञान शाखा १०० टक्के,जानकीदेवी चौरागडे कुडवा १०० टक्के,गुरुनानक ज्यु.महा.गोंदियाच्या वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के,मनोहरभाई पटेल सैनिक स्कुल कुडवा १०० टक्के,के.डी.भाष्कर हाय.डांर्गोली विज्ञान शाखा १०० टक्के,मातोश्री ज्यु.कॉलेज नागरा १०० टक्के,राजस्थानी स्कुल १०० टक्के,साकेत ज्यु कॉलेज विज्ञान शाखा १०० टक्के,श्री गणेशन ज्यु.कॉलेज गणेशनगरचा समावेश आहे.