कोचिंग क्लासेसना आठ दिवसांची मुदत

0
17
गोंदिया ,दि.07: गुजरात राज्यातील सुरत येथे काही दिवसांपूर्वी ट्युशन क्लासेला आग लागून विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. त्या घटनेची पुनरावृत्ती गोंदियात होऊ नये. या संदर्भात गोंदिया नगर पालिका गंभीर बनली आहे.
यापूर्वी पालिकेने ट्युशन क्लासेसला नोटीस बजावले होते. मात्र ट्युशन क्लासेस संचालकांनी ती बाब अद्याप गांभीर्याने घेतली नाही. यावर गोंदिया नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी गंभीर भूमिका घेत अग्निशमन विभागाला तातडीने ही बाब मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यासंदर्भाने पालिकेच्या अग्निशमन विभागाने आज(ता.6) ट्युशन क्लासेसला नोटीस बजावली. येत्या 8 दिवसांत अग्निशमन यंत्रणा न बसविल्यास कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे. नगर पालिका अध्यक्ष अशोक इंगळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत पालकांनी केले आहे.