अनुलोम संस्थेच्या तर्फे अंबाडा येथे तलाव खोलीकरण

0
36
मोर्शी,दि. ०७: अंबाडा येथील त्रिवेणी तलाव यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये कोरडा झालेला होता.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत
मोर्शी तालुक्यातील लघु प्रकल्प त्रिवेणी तलावाला गाळमुक्त करण्याचा कामाला प्रत्यक्ष सुरुवात अनुलोम संस्थेच्या  माध्यमातून लोकसहभागातून करण्य़ात आले आहे.
गाळमुक्त धरणामुळे तलावातील पाण्याची साठवण क्षमता व पाणी अडवण्याच्या क्षमतेत वाढ होते. परिसरातील विहिरी,बोअरवेल व तलावातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते तसेच गाळयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा पोत सुधारतो व उत्पादन क्षमतेत वाढ होते तलावातील गाळ काढून परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतात टाकावा योजनेचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी ( 03 जून)त्रिवेणी तलावाचा गाळ काढण्यात आला. कार्यक्रमाचा उद्घघाटन सोहळा पाणी फौंडेशन चे कार्यकर्ते व हर्षलजी पराते (उपविभाग जनसेवक) यांच्या हस्ते पार पडला.भागजनसेवक राहुल श्रीराव यांनी पुजनानंतर उपस्थितांना अनुलोम व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेची माहिती दिली या योजनेला शेतकऱ्यांचा खुपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.स्थानमित्र तलाव व्यवस्थापक व गावातील शेतकरी उपस्थित होते.या कार्यक्रमाकरिता पाणी फाउंडेशनच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले.