किरसान मिशन शाळेत राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

0
18

गोरेगाव,दि.26:-स्थानिक किरसान ईटरनॅशनल पब्लिक स्कूल येथे आज 26 जुन ला दिवस राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. तसेच नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष डाॅ. नामदेव किरसान, शाळेच्या प्राचार्या रूपाली मेहता उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना यावेळी शाहू महाराजांविषयी व त्यानी केलेल्या कार्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शिक्षकांनी नवोदित विद्यार्थ्यांचे बॅचेस लावून स्वागत केले.शिक्षकांनी परिपाठ व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालक शुभागी वर्हाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन छाया चुलपार यांनी मानले.

गोरेगाव :- स्थानिक किरसान मिशन स्कूल व ज्युनिअर कॉलेज गोरेगाव इथे राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. एन. डी. किरसान होते. त्यानी शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी शाहू महाराज एक थोर समाज सुधारक व विचारवंत होते असे सांगितले.शाळेचे प्राचार्य डॉ. विनोद उके, सुभाष चुलपार, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पिंडकेपार जिप शाळेत पुष्पगुच्छ देऊन नवागताचे स्वागत
गोरेगाव-आज 26 जून पासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विध्यार्थ्यांन मध्ये उत्साह व आनंद निर्माण व्हावे म्हणून पुष्पगुच्छ, पेन,पाठयपुस्तक देऊन नवागताचे स्वागत करण्यात आले.तालुक्यातील जीप वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपार येथे सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर नव्याने रुजू झालेले शिक्षक व नवागतांचे परिचय करून देण्यात आले. स्वागतानंतर शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे म्हणून पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिठाई , बिस्किट देऊन त्यांचा मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती कडून नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक पी डी पटले, ब्राम्हणकर मैडम व टी एन पारधी सरांचा रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष भरत घासले, उपादयक्ष खोमेन्द्र बिसेन, सदस्य रमेश बिसेन,सरपंच दुलीचंद रहांगडाले, विषयतद्दन ठाकूर , शिक्षक कटरे व इतर मान्यवर उपस्थित होते.