छत्रपती शाहू महाराज यांना प्रशासनातर्फे अभिवादन

0
14
????????????????????????????????????

गडचिरोली,दि.२६: आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला निवासी अप्पर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, तहसिलदार भांडारकर, नायब तहसिलदार चडगूलवार, जिल्हा नाझर डी.ए. ठाकरे, संदीप राऊत, कोल्हटकर , चाभांरे व अधिकारी – कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. अधिकारी -कर्मचारी यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन
गडचिरोली,दि.२६: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिनांक १ जुलै २०१९ रोजी सोमवारी दुपारी ३.०० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी २.०० ते ३.०० वाजेपर्यंत राहील आणि सभेला ३.०० वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर दिनांक १ जुलै २०१९ रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहीत नमुन्यात दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.