विद्यार्थ्यांनी सहकारी तत्वावर खानावळ चालवावी : डॉ परिणय फुके

0
26

नागपूर दि.13 जुलै : आदिवासी मुलांचे पारडी येथील शासकीय वसतीगृह तसेच हिवरीनगर येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह येथे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेतले.शासकीय आदिवासी मुलांमुलींचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण नास्ता इत्यादी करिता डिबीटी मार्फत विद्यार्थ्यांच्या खात्यात निधी देण्यात येतो. परंतु वस्तीगृहातच मेस सुविधा उपलब्ध करून देण्याची विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना डिबीटी मार्फत प्राप्त झालेल्या निधी मधूनच आदिवासी मुलामुलींनी स्वतः वसतिगृहात प्रयोगशील मार्गाने सहकारी तत्वावर खानावळ चालवावी असे आवाहन आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.

तसेच शासकीय आदिवासी मुलांमुलींचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासना मार्फत देय असलेल्या सर्व सोई सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे, तसेच वसतिगृहातील स्वच्छता, विद्यार्थ्यांचे आरोग्य व त्यांच्या शैक्षणिक बाबींवर विशेष लक्ष देण्याची निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी आदिवासी विकास अपर आयुक्त डॉ संदीप राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री भोंगाडे, इतर कर्मचारी उपस्थित होते.