प्रोग्रेसिव्हचे सायन्स ऑलिम्पियाडमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयश

0
14

गोंदिया,दि.02 : स्थानिक प्रोग्रेसिव्ह इंटरनेशनल शाळाच्या विद्यार्थ्यांनी सायंस ऑलिम्पीयाड फाउंडेशनद्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून शाळेचे नाव गौरविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यां मध्ये वर्ग १ लीची अवनी प्रशांत दखने स्वर्ण पदक, रीत सुनिल लधानी झोनल रजत पदक व रोख ८३३ रूपये आपले नावे केले. त्याच बरोबर हर्षीता रविकांत दराडे, हिमानी गजेंद्र कावडे, खुशबू ओमेश्‍वर रहांगडाले, लुभांशी देवेंद्र बिसेन, नव्या मनिषकुमार जेठवानी, प्रियांशी संतोष मोटघरे, सोमीतसिंग सुनिलसिंग बघेल, कुंजल युगलकिशोर ठाकूर, आराध्या सुनीलकुमार शर्मा, ध्वज प्रेमप्रकाश हनवते यांना विशेष पुरस्काराच्या स्वरूपात १000 रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, उपाध्यक्ष अलका कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार, उपाध्यक्ष पद्मा कटकवार, कोषाध्यक्ष ज्योती पहिरे, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, प्रमोद वाडी, विकास पटले, राहुल रामटेके, दिव्यांशु जायस्वाल, महेंद्र हरिणखेडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.