मुसळधार पावसातही शिक्षकांचे सविंधान चौकात आंदोलन सुरुच

0
9
नागपूर,दि.09ः- 5 आॅगस्ट पासून राज्यातील प्रत्येक विभागात विनाअनुदानीत शिक्षकांचे अनेक मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे.नागपूर येथील सविंधान चौकात सुरू असलेल्या आंदोलनात आंदोलक शिक्षकांना मुसळधार पावसासह अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाही आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. नागपूर विभागातील विनाअनुदानीत शिक्षक प्रचलित नियमानुसार अनुदान मिळण्यासाठी आंदोलन करीत आहेत.या आंदोलनात विभागातील 6 जिल्ह्यातील सुमारे 200 विनाअनुदानीत शिक्षक मुसळधार पाऊस सुरु असतानाही सहभागी झालेले आहेत.आपल्या न्याय मागण्यासाठी आज पर्यंत 156 आंदोलन या विनाअनुदानीत शिक्षकांनी केले असून हे 157 वे आंदोलन प्रत्येक विभागात सुरू आहे. लोकशाहीत भारताचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना इतके सारे आंदोलन करावे लागले यापेक्षा दुर्दैव कोणते अशा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झालेला आहे.या आंदोलनात नागपूर विभागाचे अध्यक्ष कामनापूरे,सरटकरस,पाटील,जांगडे,किशोर जुवार,वाघमारे,महेशकर,पिसे, गडचिरोली येथील कोकुलवार,पोरेड्डीवार,कवाडकर, भड. वर्धा जिल्ह्यातील अजय भोयर, आमितभाई प्रसाद, भंडारा जिल्ह्यातील गजभिये, गोंदिया जिल्ह्यातील भोवते व चंद्पूर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.यात महिला शिक्षिकाही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.