गावची शाळा आमची शाळाचे पुरस्कार वितरण

0
18

गोंदिया,दि.12-जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्याथ्यांना शैक्षणिक सुविधा चांगल्या पध्दतीने मिळाव्यात यासाठी गावची शाळा-आमची शाळा हा उपक्रम गेल्या दोन तीन वर्षापासून राबविण्यात येत आहे.या अभियानामूळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा स्तर उचांवल्याने यावर्षीही हे अभियान राबविण्यात आले.या अभियानात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील शाळांची तपासणी केल्यानंतर जिल्हास्तरावर पहिल्या तीन मध्ये आलेल्या शाळांचा तसेच तालुकास्तरावरील शाळांचा आज मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती मदन पटले,यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी घनश्याम पाटील,जि.प.सदस्य सीता रहांगडाले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.या पुरस्कार वितरण सोहळ्याला जिल्हयातील शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.