मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजार कोसळला

0
8

वृत्तसंस्था
मुंबई दि. १२ –- मुंबई शेअर बाजारात आज (मंगळवार) विक्रीचा जोर असल्याने मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 629 अंशांनी कोसळून 26 हजार 877 पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 194 अंशांनी घसरून बंद झाला आहे.

मिडकॅप निर्देशांक 1.5 टक्‍क्‍यांनी कोसळून 12 हजार 577 पातळीवर तर स्मॉलकॅप निर्देशांक 5 हजार 336 पातळीवर व्यवहार करत 2.2 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. राष्ट्रीय शेअर निर्देशांक निफ्टी 194 अंशांनी घसरून 8 हजार 128 पातळीवर व्यवहार करत बंद झाला आहे. इतर सर्व क्षेत्रात नकारात्मक व्यवहार होते. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक, माध्यम, वित्त, ऊर्जा आणि बॅंक निफ्टी घसरले आहेत. हिरो मोटोकॉर्प, डॉ रेड्डी आणि कोल इंडिया यांचे शेअर्स आज सर्वाधिक वधारले होते तर बॅंक ऑफ बडोदा, आणि टाटा स्टील यांचे भाव घसरुन बंद झाले आहेत.