श्रेया लांजेवारचे प्रज्ञा शोध परीक्षेत यश

0
15

गोंदिया,दि.१५ : नोव्हेंबर २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत श्रेया लांजेवार ही जिल्ह्यात पहिली आली आहे. श्रेया ही गोंदिया येथील विवेक मंदीर हायस्कूलची १० व्या वर्गाची विद्यार्थीनी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांचेकडून राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतील यशाबद्दल २ हजार रुपयांचा धनादेश मुख्याध्यापिका संगिता निगुरकर यांच्या हस्ते श्रेयाला देण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या समतादूत करुणा मेश्राम उपस्थित होत्या. श्रेयाने यशाचे श्रेय वडील प्रकाश लांजेवार व आई सरोजिनी लांजेवार यांना दिले