पात्र विद्यार्थ्यांना 31 मार्चपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

0
80
Mumbai Feb. 11 :- NCP leader Dhananjay Munde address to media at NCP Bhavan in Mumbai. ( pic by Ravindra Zende )

मुंबई, दि.3: येत्या 31 मार्चपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाईल असे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. या विषयाला अनुसरून सदस्य सर्वश्री. गिरीशचंद्र व्यास, प्रविण पोटे, डॉ. रणजीत पाटील, विक्रम काळे, प्रा. अनिल सोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

श्री. मुंडे म्हणाले, व्यक्तीगत लाभाच्या सर्व योजनांचा लाभ हा केंद्र शासनाच्या ‘पर्सनल फंड मॅनेजमेंट सिस्टीम’ या प्रणालीच्या माध्यमातुन दिला जातो. या यंत्रणेच्या तांत्रिक मर्यांदांमुळे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशीप प्रतिपुर्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी येत होत्या. या यंत्रणेच्या माध्यमातून एका वेळी 25 ते 30 हजार एवढ्याच  प्रकरणांचा निकाल लावता येतो. ही मर्यादा केंद्राने वाढवावी यासाठी विनंती करण्यात येईल. त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती मिळण्यात येत असलेल्या इतर अडचणींवर काय उपाय योजना करता येतील, यासाठी सर्व आमदारांची बैठक घेऊन विचारविनिमय केला जाईल.

महाडिबीटी पोर्टलवर  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशीप प्रतिपुर्ती योजनेंतर्गत नोंदणीकृत झालेल्या  अनुसूचित जातीच्या 4 लाख 60 हजार 760 अर्जापैकी 3 लाख 89 हजार 439 अर्ज पात्र ठरले आहेत. त्यापैकी 2 लाख 71 हजार 038 अर्जाचे 378 कोटी 35 इतक्या रकमेची देयके  महाडीबीटी पोर्टल द्वारे जनरेट करण्यात आली आहेत. त्यामधील 1 लाख 41 हजार 527 विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर शुल्काची रुपये 206.19 कोटी इतकी रक्कम संबधीत विद्यार्थ्याच्या महाडीबीटी पोर्टलवरील ई वॉलेट वर वितारीत करण्यात आली आहे. उर्वरीत 1 लाख 29 हजार 511 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम रुपये 172.16 कोटी महाडिबीटी वरिल पर्सनल फंड मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणाली द्वारे वितरणाची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी दिली.