गोंदिया दि.23: देश व राज्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना घराबाहेर पडू नये, असा सुचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान मार्च ते एप्रिल मध्ये होणार्या सर्व परीक्षा अनिश्चितकाळापर्यत रद्द करून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पदवी परीक्षा ही लॉकडाऊननंतर होईल, अशी घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी केली. परंतु, राज्याची स्थिती पाहता जोपर्यत संचारबंदी शिथिल होत नाही, तोपर्यत पदवी व इतर परीक्षा घेणे शक्य नाही. करीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातंर्गत घेण्यात येणारी पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेवून विद्यार्थ्यांना कॅरीआन देण्यात यावा, अशी मागणी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआ) च्या वतीने जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी केली आहे. या संदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व रातुम नागपूरचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले आहे.
देश व राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासन, प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेत २३ मार्चपासून लॉकडाऊन घोषित केले असून राज्य व जिल्ह्याच्या सिमा बंद केल्या आहेत. संचारबंदी काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सुचना करून विविध उपाययोजना सुरू आहेत. विषाणू संसर्गाची खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली असून शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. सर्व परीक्षा अनिश्चितकाळापर्यत रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे शैक्षणिक सत्राचा शेवटचा टप्पा अपूर्णच राहिला आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्पेâ घेण्यात येणार्या पदवी परीक्षाही लॉकडाऊननंतर घेण्याचा घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी दिवसात विद्यार्थ्यांवर शैक्षणिक ताण पडणार नाही, याकरीता पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा घेवून इतर विद्यार्थ्यांना कॅरीआन देण्यात यावा किंवा इतर सत्राच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेवून थेट नविन शैक्षणिक वर्षाला सुरूवात करावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी एनएसयुआचे जिल्हाध्यक्ष हरीष तुळसकर यांनी निवेदनातून केली आहे.
मागणीचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षणमंत्री व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांना देण्यात आले आहेत. यावर शासनस्तरावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष राहणार आहे.




