मदरशांमध्ये चार विषय सक्तीचे – खडसे

0
12

मुंबई, दि. ११ – महाराष्ट्रात असणा-या मदरशांमधील विद्यार्थ्यांसाठी चार विषय सक्तीचे करण्यात आल्याचे अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी सांगितले.
यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र अशा विषयांचा समावेश असून यावर्षीपासून ही सक्ती लागू होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मदरशांमधील विद्यार्थ्यांना हे चार विषय शिकवले नाहीत, तर त्या मदरशांना दिले जाणारे अनुदान मिऴणार नाही, असेही एकनाथ खडसे यांनी यावेऴी सांगितले आहे. दरम्यान, राज्यात सुमारे १८०० मदरसे आहेत.

तर दुसरीकडे यंदाच्या दहावीच्या परिक्षेत अपयश झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक खूश खबर असून त्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. दहावीच्या या परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जुलैच्या दुस-या आठवड्यात त्यांची परीक्षा घेण्यात येणार असून या परिक्षेचा निकाल ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.