पुण्याचा चिन्मय साहू ओबीसी-विशेष विद्यार्थ्यांत देशात पहिला

0
4

मुंबई दि. १८: मुंबई आयआयटीतर्फे घेण्यात आलेल्या जेईई (अँडव्हान्स) २0१५ परीक्षेत पुण्याचा चिन्मय साहू ओबीसी-विशेष विद्यार्थ्यांत देशात पहिला आला आहे. त्याचप्रमाणे मुंबईसाठी सर्वाधिक ६ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट झाले आहे.देशात पहिला येण्याचा मान सतना येथील सतवत जगवानी याने मिळवला आहे. त्याला ५0४ पैकी ४६९ गुण मिळाले. इंदूरचा जनक अग्रवाल या परीक्षेत दुसरा आणि मुकेश परिख तिसरा आला आहे. तर मुलींमध्ये इंदूरच्या क्रती तिवारी मुलींमध्ये देशातून पहिली आली आहे.देशातील १८ आयआयटी आणि धनबादमधील इंडियन स्कूल ऑफ माइन्स या संस्थांमधील एकूण १0 हजार ६ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली.एकूण २६ हजार ४५६ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यात २३ हजार ४0७ विद्यार्थी आणि ३ हजार ४९ विद्यार्थिनींचा समावेश आहे.नोंदणी केलेल्या १ लाख २४ हजार ७४१ विद्यार्थ्यांपैकी एकूण १ लाख १७ हजार २३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.