भंडारा नगर परिषदेला घेराव;जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणार अशुद्ध पाण्यावर चर्चा

0
8

भंडारा दि. १८: वैनगंगा नदीचा पाणी नागनदीच्या घाण पाण्यामुळे व गोसे धरणाचा पाणी स्थरावल्याने फारच दुषित झाला आहे. नगर परिषदेमार्फत पाणी शुध्दीकरण करुन ही दुषित पाण्याचे वितरण होत आहे. परिणाम स्वरुप आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच पावसाळ्याला सुरुवा झाली असली तरी साफ सफाईची यंत्रणा सक्रिय झाली नाही व घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने वरील दोन्ही प्रश्नावर १५ जून ला दुपारी १ वाजता नगर पालिका गेटसमोर नगर पालिकेला घेराव आंदोलन भाकपच्या वतीने नगर सेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
नगराध्यख मुख्याधिकाऱ्याने चर्चेकरिता आंदोलनकर्त्यांना आमंत्रित केले. याप्रसंगी पाणी विभागाचे अभियंते व लिपिकांना सुध्दा बोलावण्यात आले. शुध्द पाणी, स्वच्छ नाली-नाले व चांगले रस्ते हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. आणि तो त्यांना मिळाला पाहिजे असी मागणी नगर सेवक हिवराज उके व भाकपच्या शिष्ट मंडळाने केली. नगराध्यक्षांनी प्रयत्नाने आम्ही दोन वेळा पिण्याचे पाणी पुरवत आहोत. जिथे मिळत नाही तिथे पोहचवण्याचा तात्काळ प्रयत्न करु. पण वैनगंगेचे पाणी प्रदुषित झाले आहे की पाणी शुध्द करुन ही शुध्द होत नाही. त्यासाठी तुमच्या सोबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून दुषित पाण्याची समस्या निकालात काढू असे नगराध्यक्षांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
यासंदर्भात उद्या १६ जूनला जिल्हाधिकाऱ्यांच्या दुपारी ३ ते ४ वाजता भेटीचा निर्णय संमतीने घेण्यात आला.सफाईची आहे ती यंत्रणा चुस्त दुरुस्त करु व तात्कालिन स्तरावर सफाईसाठी ३० अतिरिक्त कामगार व जेसीपी लावले असल्याचे सांगितले. तसेच ४० नवीन घंटागाडी त्वरित लावल्या जातील आणि कंटेनरसाठी सभेची मंजूरी घेवून व्यवस्था करण्यात येइल असे सांगितले.याप्रसंगी नगरसेवक हिवराज उके यांचे सोबत माणिकराव कुकडकर, झुलनबाई नंदागवळी, गजानन पाचे, वामनराव चांदेवार, मोहनलाल शिंगाडे, सुरेंद्र सुखदेवे, पुष्पाबाई तिघरे, गौतम भोयर, प्रताप डोंगरे, दिलीप ढगे, दिलीप क्षिरसागर, भोयर, सोनवाने, निपाने, अर्जून पाचे, अमित क्षीरसागर इत्यादी मोठ्या नागरिक उपस्थित होते.